📍 श्रीगोंदा • 📅 १३ ऑगस्ट २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी व्यक्त केले विचार
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन
श्रीगोंदा (प्रतिनिधी) महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे होते. ते म्हणाले की, अहिल्याबाई होळकर ह्या न्यायप्रिय राणी होत्या. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी विहिरी बांधल्या. शेतीमध्ये सुधारणा केल्या. रस्ते निर्माण केले. अनेक धर्मशाळा निर्माण केल्या.
लोककल्याणकारी राणी म्हणून त्यांची प्रतिमा आजही समाज मनात आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम कानडे यांनी केले.
उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, अधीक्षक बाळासाहेब राऊत व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.