रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. महादेव जरे यांच्या सेवापूर्ती निमित्त कृतज्ञता गौरव समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. यावेळी बोलताना बबनराव पाचपुते म्हणाले की, "प्राचार्य डॉ. जरे यांनी आपल्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घातली. उर्वरित आयुष्यात त्यांनी पर्यटन व लेखनास वेळ द्यावा," अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश अंतपूरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. ते म्हणाले, "डॉ. जरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा असून त्यांनी ज्ञानाच्या कक्षा अधिक विस्ताराव्यात," असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, मा. राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव प्राचार्य बंडू पवार, नगराध्यक्ष सौ. सुनिताताई खेतमाळीस आदी मान्यवरांनीही डॉ. जरे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सन्मानार्थ प्राचार्य डॉ. महादेव जरे व सौ. लता जरे यांचा सन्मान करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना डॉ. जरे यांनी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. महाविद्यालय विकास समितीचा सदस्य म्हणूनही काम केले. कामगाराचा मुलगा असल्याने आयुष्यात अनेक प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागला; मात्र संघर्षातूनच माझा प्रवास घडला," असे ते म्हणाले.
या समारंभास रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, महावीर पटवा, प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, प्राचार्य तुकाराम कन्हेरकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्राचार्य डॉ. एकनाथ खांद्वे, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, प्राचार्य दिलीप भुजबळ, प्राचार्य शहाजी मखरे, उपनगराध्यक्ष अलकाताई अनभुले, संग्राम घोडके, दिलीप तुपे, पत्रकार बाळासाहेब काकडे, पत्रकार पिटर रणसिंग, पत्रकार चंदन घोडके तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ठ, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.