Logo
News.Rayat.in
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
📍 श्रीगोंदा • 📅 २ मार्च २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
63 ते 70 किलो वजनगटात उल्लेखनीय कामगिरी; चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झेप

कामिनी देविकर हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेसाठी निवड

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची खेळाडू कामिनी देविकर हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भोपाळ येथे झालेल्या दक्षिण/पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत तिने 63 ते 70 किलो वजनगटात उल्लेखनीय कामगिरी करत हे यश मिळवले.

कामिनी देविकर ज्युदो स्पर्धेत कामगिरी करताना

कामिनीच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. तिचे वडील पंढरीनाथ देविकर आणि आई सौ. सविता देविकर यांनी ज्युदो सारख्या आव्हानात्मक खेळामध्ये आपल्या मुलीला खेळण्यास प्रोत्साहित करून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ग्रामीण भागातील मुलींसमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

कामिनीच्या या निवडीमुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. तिचे यश हे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे प्रतीक आहे. ती आता चंदीगड येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत महाविद्यालय व विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

कामिनी देविकर मार्गदर्शकांसह

तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन माजी मंत्री मान. बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मान. राहुलदादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मान. बाबासाहेब भोस, मान. महावीर पटवा, प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. रमेश थोरात, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. रत्नाकर झिटे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कामिनीला शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक संजय डफळ व श्री. हनुमंत फंड (इंटरनॅशनल कुस्ती संकुल, श्रीगोंदा) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्यपूर्ण सराव करत हे यश मिळवले आहे. आता चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही ती उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.