Logo
News.Rayat.in
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
📍 श्रीगोंदा • 📅 ९ मार्च २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
रसायनशास्त्र विभागाच्यावतीने गुगल मीटवर एकदिवसीय ई-संमेलन; ८८ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांचा सहभाग

शाश्वत विकासासाठी रसायनशास्त्र विषयावर ई-संमेलन संपन्न

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथील रसायनशास्त्र विभागाच्यावतीने "Aspects of Chemical Science for Sustainable Development" या विषयावर सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी एकदिवसीय ई-संमेलन गुगल मीट या ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आले.

प्रा. डॉ. बालासो डी. जाधव यांचे मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या प्रारंभी रसायनशास्त्र विभागप्रमुख व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून परिषद विषयाची ओळख करून दिली. पहिल्या सत्रात प्रा. डॉ. बालासो डी. जाधव (दहिवडी महाविद्यालय, दहिवडी) यांनी "Aspects of Chemical Sciences for Sustainable Development" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांचा परिचय डॉ. प्रदीप उंडे यांनी करून दिला.

दुसऱ्या सत्रात डॉ. दत्तात्रय उकले यांनी "Metal Mediated Base Pair in Nucleic Acids and Vaccine Synthesis and Their Action Mechanism" या विषयावर व्याख्यान दिले. त्यांचा परिचय डॉ. अजित इंगळे यांनी करून दिला. या विषयातील संशोधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

ई-संमेलनातील सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी शाश्वत विकासासाठी रसायनशास्त्राचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, "रसायनशास्त्रातील नवनवीन संशोधनामुळे पर्यावरणपूरक व शाश्वत विकास साध्य करणे शक्य होत आहे. अशा ई-संमेलनांमुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना नवीन संशोधनाची दिशा मिळते."

या ई-संमेलनात ८८ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध महाविद्यालयांमधून आलेल्या या सहभागींनी रसायनशास्त्रातील शाश्वत विकासाच्या विविध पैलूंवर विचारविमर्श केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नलगे एस. एस. यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. भाऊ बुलाखे यांनी केले.

सदर ई-संमेलनाचे आयोजन प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन समितीत डॉ. नितीन थोरात, डॉ. एस. एम. भुजबळ, डॉ. अजित इंगळे, डॉ. प्रदीप उंडे, डॉ. के. डी. ढवळे, प्रा. भाऊ बुलाखे, प्रा. नलगे एस. एस., प्रा. म्हस्के पी. व्ही., प्रा. घाडगे आर. जे., प्रा. हिरणवळे पी. व्ही. व प्रा. पानसरे एम. एस. यांनी सहकार्य केले. सर्व सहभागींनी या उपक्रमाचे कौतुक केले व अशा संमेलनांमुळे रसायनशास्त्र क्षेत्रातील नवीन संशोधनाची माहिती मिळण्यास मदत होते, अशी भावना व्यक्त केली.