Logo
News.Rayat.in
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
📍 श्रीगोंदा • 📅 २४ मार्च २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली; प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी व्यक्त केले विचार

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

श्रीगोंदा (प्रतिनिधी) लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागातूनच रयत शिक्षण संस्था उभी राहिली. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कर्मवीरांची सावली होती. या माऊलीने बहुजनांच्या मुलांसाठी आपले आयुष्य समर्पित केले असे विचार महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी व्यक्त केले. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनप्रसंगी सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतिदिन कार्यक्रम

सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम कानडे यांनी प्रस्तावना केली. प्रा. संदीप दरेकर म्हणाले की, स्त्रियांच्या त्यागातून महापुरुष घडले. तसेच लक्ष्मीबाईंच्या त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली.

स्मृतिदिन कार्यक्रमात उपस्थित मान्यवर

याप्रसंगी उपप्राचार्य प्रो. डॉ. नितीन थोरात, अधीक्षक बाळासाहेब राऊत, डॉ. राहुल गायकवाड, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.